
कोरोनाकाळातील रिकाम्या वेळेत लोकांनी आपल्या आवडीनिवडी जपल्या. कुणी कुकिंगमध्ये रमले तर कुणी बागकामात, तर काहींनी आपल्या आवडीचा उद्योगधंदा सुरू केला. मात्र, या वेळेचा सदुपयोग करून ब्रिटनमधील डगलस स्मिथ या शेतकऱ्याने कमाल केली आहे. त्याने असे काम केले आहे की, त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
डगलसला आधीपासूनच बागकामाची आवड. त्याने लॉकडाऊनच्या काळात इनोव्हेटिव्ह प्लांटेशन मेथड पद्धतीचा अवलंब करत चक्क एकाच फांदीवर 1269 टोमॅटोचे उत्पन्न घेण्याची किमया केली आहे. त्याच्या या कामगिरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली आहे. डगलस याने स्वतःचा रेकॉर्ड मोडत नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. यापूर्वी त्याने एकाच फांदीवर 839 टोमॅटोचे उत्पन्न घेतले होते.



























































