
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील गुरूवारी एकुण 13 रुग्णांची प्रकृती पुर्णपणे बरी झाली. हे सर्व रुग्ण 6 ते 65 वर्षे वयोगटातील आहेत. एकुण 13 रुग्णांपैकी 9 रुग्णांना कोविड-19 निमोनियाची लक्षणे होती व गंभीर स्वरुपाचा आजार होता. यातील एक रुग्ण 7 दिवस व्हेंटीलेटर सपोर्टवर होता. मागील 5 ते 6 दिवसापासुन या रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसुन आली नसल्यामुळे आय. सी. एम. आर. च्या नवीन प्राप्त डिस्चार्ज् (रुग्णांना घरी सोडण्याच्या) मार्गदर्शक सुचनेनुसार त्यांना गुरूवारी डिस्चार्ज देण्यात आले.
त्यातील 7 व्यक्तींना Home Quarantine व 6 व्यक्तींना Institutional Quarantine करण्यात येणार आहे. यातील 6 रुग्ण लातुर शहरातील व 6 लातुर जिल्हयातील ग्रामीण भागातील असुन एक रुग्ण धाराशिव जिल्हयातील आहे. तसेच यामध्ये 6 वर्षाची एक मुलगी असुन तीने सुध्दा कोरोनावर मात केली आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.





























































