थायलंडमध्ये पबच्या आगीत 13 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

  थायलंड येथील एका पबला शुक्रवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत 13 लोकांचा मृत्यू झाला, तर जवळपास 36 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे. आगीचे नेमके कारण अजून उघड झालेले नाही, असे पोलीस दलातील मेजर जनरल अत्तसित किचाहन यांनी सांगितले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.