शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 135 कोटी रुपये नगर जिल्ह्याला मिळाले

983

राज्यांमध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये आलेल्या महा चक्रीवादळामुळे आणि अवेळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यांतील 325 तालुक्यांमधील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी  जाहीर केलेल्या मदतीतीला 135 कोटी रुपयांचे अनुदान नगर जिल्ह्याला मिळाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यामध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे नगर जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. साधारण तीन लाख 71 हजार हेक्‍टरवर नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते .प्रशासनाने तसेच तलाठी व महसूल यंत्रणेने तसेच कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केले होते.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर एकत्रित अहवाल राज्य शासनाकडे पाठवला होता. राज्य शासनाने नुकसान झालेल्या गावांना मदत देण्याचा निर्णय घेऊन मदत जाहीर केली आहे .नगर जिल्ह्यामध्ये साधारणता 475 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये फळपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. राज्य शासनाने पहिल्या टप्प्यातील अनुदान जाहीर केले आहे. बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करताना जो काही शासन निर्णय दिलेला आहे त्याचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना दिल्या आहेत. निधी वितरित केल्यानंतर तसेच रक्कम वाटप झाल्यानंतर लाभार्थी यादी त्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी असे निर्देशही देण्यात आले आहेत. नगर जिल्ह्यासाठी 135 कोटी रुपयांच्या अनुदान येथील प्रशासनास प्राप्त झाले आहे. हे अनुदान शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार वाटप करायचे आहे.

नगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांचे सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे दिलेली रक्कम ही वाढवून मिळावी अशी मागणीही  शेतकऱ्यांनी तसेच विविध राजकीय पक्षांनी केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नुकसानीचे 135 कोटी रुपये मंगळवारी नगर जिल्ह्यासाठी प्राप्त झालेले आहे आगामी काळामध्ये उर्वरित किती रक्कम येते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या