जम्मू कश्मीरसाठी 1350 कोटी रुपयांचे पॅकेज, वीज आणि पाणी बिल 50 टक्के माफ

जम्मू कश्मीरचे नवनियुक्त उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राज्यासाठी 1350 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. तसेच वीज बिल, पाणी बिलसह अनेक बिलांमध्ये माफी दिली आहे.

उपराज्यापालांनी राज्यासाठी 1350 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. तसेच राज्यातील नागरिकांचा पाणी बिल आणि वीज बिल 50 टक्क्यांनी माफ करण्यात आला आहे. या पॅकेजमुळे राज्यातील अनेक उद्योगांना फायदा होईल तसेच आत्मनिर्भर भारत योजनेला हातभार लागेल असे मत सिन्हा यांनी व्यक्त केले आहे. तसेच जम्मू कश्मीरच्या कर्जधारकांचे मार्च 2021 पर्यंत स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट देण्यात आले आहे. अनेक पर्यटन क्षेत्रात आर्थिक मदत देण्यात आली आहे. उद्योजकांना 5 टक्के व्याजावर कर्ज देण्यात येणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या