चंद्रपूरमध्ये एकाच दिवशी आढळले कोरोनाचे 14 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 148 वर

चंद्रपूरमध्ये आज एकाच दिवशी कोरोनाचे 14 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आज सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 148 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 80 नागरिक कोरोना मुक्त झाले असून सध्या 68 नागरिक जिल्हयात उपचार घेत आहेत. 148 संख्येमध्ये चंद्रपूर शहरात निदान झालेले अन्य जिल्हयातील 4 बाधित आहेत. हे चारही बाधित राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत.  ब्रम्हपुरी येथील बाधितांची संख्या रोज वाढत आहे. गुरुवारी ब्रह्मपुरी शहरातील भवानी वार्ड येथील एक, तालुक्यातील खेड व बेटाळा या दोन गावातील प्रत्येकी एका पॉझिटिव्हचा समावेश आहे. तालुक्यातील आजची पॉझिटीव्ह संख्या तीन झाली आहे.  तर मूल तालुक्यातील बेंबाळ येथील हैदराबाद येथून आलेला नागरिक पॉझिटिव्ह ठरला आहे. मुल तालुक्यातीलच जानाळा येथूनही संपर्कातून पॉझिटिव्ह झालेल्या दोन नागरिकांचा समावेश आहे. भद्रावती शहरातील पॉझिटिव्ह बाधितांच्या संपर्कातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली असून शहरात सतत संख्या वाढत आहे.  गडचांदूर येथेही कोरोनाचे 3 रुग्ण आढळले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या