
लातूरमध्ये आज कोरोनाचे 141 रुग्ण आढळले आहेत. तसेच आज 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यापासून सुरु झालेला कोरोनाचा कहर ऑगस्टमध्येही कायम आहे. दररोज संख्या वाढत जात आहे. तसेच कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढत चाललेले आहेत. जिल्ह्यात पुन्हा 144 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झालेली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 6 हजार 580 झालेली आहे.
सध्या जिल्ह्यात 1470 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज 219 रुग्ण उपचारामुळे बरे झाल्याने घरी परतले आहेत. आजपर्यंत तब्बल 4877 रुग्ण बरे झालेले असून कोरोनामुळे बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी 74.11 झालेली आहे. कोरोनाचा उपचार सुरु असताना 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहिर केलेले आहे.
























































