मुंबईत कोरोनाचे 16 रुग्ण, चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

मुंबईत आज कोरोनाचे 16 रुग्ण सापडले तर कोरोनाबाधित 4 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. या बाळाला अक्युट डिट्रेस सिंड्रोमचा दीर्घकालीन आजार होता.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी तिच्यात अजूनही चढउतार पाहायला मिळत आहेत. सोमवारी मुंबईत दोन रुग्ण सापडले होते. मात्र, आज पुन्हा ही संख्या 16 वर पोहोचली. त्यापैकी 14 जणांना कोणतीही लक्षणे नव्हती. यातील दोघा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दिवसभरात 23 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मुंबईत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून ती आज 142 वर पोहोचली.