मास्क न वापरणाऱ्या 16 जणांवर दंडात्मक कारवाई, आठ हजार रुपये दंड वसूल

655

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मास्क परिधान करणे क्रमप्राप्त केले असतानाही अनेकजण मास्कचा वापर करत नाहीत. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य अधिका-यांनी मास्कचा वापर न करणाऱ्या 16 जणांवर आज (शुक्रवारी) दंडात्मक कारवाई केली आहे. प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे आठ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मास्कचा वापर न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला होता. त्यानुसार कारवाईला सुरुवात केली आहे. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्ग येत असलेल्या प्रभाग क्रमांक 24 मधील डांगेचौक परिसरामध्ये काही नागरिक मास्क न घातलेले आढळून आले. अशा 16 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे आठ हजार रुपये दंड वसूल केला गेला आहे.

ही कारवाई सहायक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरीक्षक बेद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक एस. बी. चन्नाल, प्रभारी आरोग्य निरीक्षक धनेश्वर थोरवे, मुकादम दिलीप खताळ, कर्मचारी अभय दारोळे, प्रशांत पवार, अरुण राऊत ,अनिल डोंगरे, सूर्यकांत चाबुकस्वार यांच्यापथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या