एका कुटुंबात 167 जण गुण्यागोविंदाने नांदतात!

आपल्याला 10 ते 15 जणांचे कुटुंब माहीत असते, पण 167 लोकांच्या कुटुंबाबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? असे कुटुंब मिझोराम राज्यातील बक्तवांग येथे आहे. चार मजली इमारतीतील 100 खोल्यांमध्ये हे कुटुंब राहते. कुटुंबप्रमुख झिओना चाना यांचे 2021 साली निधन झाले. त्या वेळी ते 76 वर्षांचे होते. त्यांना अनेक बायका-मुले होती. या कुटुंबाला दररोज 45 किलो तांदूळ, 30 कते, 40 कोंबड्या, 25 किलो डाळ, 60 किलो भाज्या आणि 20 किलो फळे लागतात. सगळे कुटुंब एकत्र राहते.