शहराचे सौंदर्य वाढणार, वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबईत 1775 कोटी खर्चून 12 केबल ब्रिज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचे सौंदर्य वाढवणारे आणि वाहतूककोंडीची समस्या सोडवणारे 1775 कोटींचे 12 केबल ब्रिज पालिका बांधणार आहे. 2024-25 पर्यंत या पुलांचे काम पूर्ण होणार आहे. संबंधित ब्रिटिशकालीन पूल बांधून 100 ते 127 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. या पुलांसाठी पालिका खर्च करणार असून पुलांचे बांधकाम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि रेल्वेकडून करण्यात येणार आहे.

अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि 14 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर पालिकेने मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून जीर्ण पूल पाडून नव्याने बांधणे आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कमी वेळेत बांधकाम होणारे आणि पर्यावरणपूरक केबल ब्रीज बांधण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आगामी चार वर्षांत कामे पूर्ण करण्यात येतील असा विश्वासही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केला.

असा होणार फायदा

z आकर्षक स्वरूप, लेझर लाइटमुळे सौंदर्यीकण वाढणार z मोठय़ा पुलांमुळे वाहतूककाsंडीची समस्या सुटणार z बांधकामाच्या वेळीही वाहतूक सुरळीत राहणार z केबल स्टेड पद्धतीमुळे मजबूत बांधकाम z पायासाठी कमी जागा लागल्याने मोकळी जागा वाढणार

या ब्रिजचे बांधकाम, असा होणार खर्च

रे रोड ब्रिज 175 कोटा
टिळक ब्रिज, दादर 375 कोटा
भायखळा ब्रिज 200 कोटी
घाटकोपर ब्रिज 200 कोटा
बेलासीस मुंबई सेंट्रल 150 कोटी
आर्थर रोड ब्रिज 250 कोटी
सेंट मेरी माझगाव 75 कोटी
करी रोड ब्रिज 50 कोटी
माटुंगा ब्रिज 50 कोटी
एस ब्रिज भायखळा 50 कोटी
लोअर परळ ब्रिज 100 कोटी
महालक्ष्मी ब्रिज 100 कोटी