घाटकोपरमध्ये 18 आठवडय़ांच्या अर्भकाला गटारात फेकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घाटकोपर पश्चिमेकडील गंगावाडी परिसरात गटारात फेकलेले  18 आठवडय़ांचे अर्भक मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. ते अर्भक मुलगा असून याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास मुख्य नियंत्रण  कक्षाकडून घाटकोपर पोलिसांना एक संदेश देण्यात आला की, गंगावाडी परिसरातील गटारात लहान मुलास फेकलेले आहे. त्यानुसार घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर त्याठिकाणी गटाराच्या वरच्या बाजूला पिवळ्या कपडय़ामध्ये गुंडाळलेले व  पालथ्या अवस्थेत असलेल अर्भक मिळून आले. त्या अर्भकाच्या शरीराला काही ठिकाणी कुरतडलेले देखील होते. त्यामुळे पोलिसांनी लगेच त्या अर्भकाला राजावाडी इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून ते मृत असल्याचे सांगितले. ते अर्भक 18 आठवडय़ांचे व मुलगा होता. घाटकोपर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.