बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकॅडमीच्या प्रवेश परीक्षेसाठी १ लाख अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिव विद्या प्रबोधिनीच्या बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकॅडमीमध्ये मोफत प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या प्रवेश परीक्षेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमातील मोफत प्रशिक्षणासाठी येत्या १५ जुलै रोजी मुंबईसह राज्यभरातील जिह्याजिह्यांमध्ये प्रवेश प्ररीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी राज्यभरातील एक लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

सनदी सेवेत मराठी विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकॅडमीचे संस्थापक-संचालक शिवसेना उपनेते विजय कदम हा उपक्रम राबवतात. मुंबईत २२ केंद्रांवर, राज्यभरातील ३६ केंद्रांवर मोफत प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा होणार आहे. परीक्षेचा निकाल २७ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. गुणवत्ता यादीत येणाऱया विद्यार्थ्यांनी सात दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. प्रशिक्षणाबाबत www.svpias.com या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेची माहिती उपलब्ध आहे, अशी माहिती विजय कदम यांनी दिली.

या केंद्रांवर होणार परीक्षा

  • मुंबई-
    एस.आय. आणि एस.एस. गर्ल्स हायस्कूल, चर्नी रोड, भाऊसाहेब हिरे कॉलेज-मलबार हिल, कीर्ती कॉलेज-दादर, साठय़े कॉलेज-विलेपार्ले, भवन्स कॉलेज-अंधेरी, संस्कार कॉलेज-गोरेगाव, बालभारती कॉलेज-कांदिवली, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी आर्टस्, सायन्स, कॉमर्स कॉलेज-दहिसर, एम.डी. कॉलेज-परळ, मनपा शाळा-चेंबूर, झुनझुनवाला कॉलेज-घाटकोपर, संदेश कॉलेज-विक्रोळी, पराग हायस्कूल-भांडुप, केळकर कॉलेज-मुलुंड.
  • ठाणे-
    एन.के.टी. कॉलेज-ठाणे पश्चिम, प्रगती कॉलेज-डोंबिवली, बिर्ला कॉलेज-कल्याण, सी.एच.एम.कॉलेज-उल्हासनगर, पीएमएम इनर व्हील हायस्कूल, अंबरनाथ.
  • नवी मुंबई-
    युरो इं टरनॅशनल-ऐरोली, रामा भगत कॉलेज-नेरूळ
  • पनवेल-
    के.एल.ई. कॉलेज-पनवेल