
लातूरमधील रेणापूर तालुक्यातील मौजे सांगवी येथे अज्ञात चोरट्यांनी घर फोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा 2 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. रेणापूर पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी काकासाहेब खंडेराव जाधव (रा. सांगवी, ता. रेणापूर) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे.
या तक्रारीत नमुद केले आहे की, अज्ञात चोरट्यांनी आपल्या घराचे कुलूप तोडून घराच प्रवेश केला. घरातील कपाट तोडून कपाटाच्या लॉकरमधील 5 तोळे सोने (किंमत सुमारे 1 लाख 50 हजार रुपये) व रोख रक्कम 1 लाख 25 हजार रुपये असा एकूण 2 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने पळवला. अज्ञात चोरट्यांविरुध्द या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माचेवाड करीत आहेत.


































































