लातूरमध्ये आढळले कोरोनाचे 2 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 105 वर  

1920

लातूरमध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत एकुण 70 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. लातूर जिल्ह्यात आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 105 वर पोहचली आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 30 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते ते सर्वच 30 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  एम.आय.एम.एस.आर. वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथील 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 17 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. स्त्री रुग्णालय लातूर येथून एका व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

लातूर जिल्ह्यातील आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 105 वर पोहचली आहे. 53 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 50 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या