कोरोनानंतर चीनमध्ये आता प्लेगची साथ; दोघांचा मृत्यू, परिसर सील

643

कोरोनाची साथ चीनमधून जगभरात फैलावली आहे. अजूनही जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. आता चीनमध्येच आणखी एक जीवघेणी साथ पसरत आहे. चीनच्या उत्तर भागात आठवड्याभरात ब्युबोनिक प्लेगमुळे दोनजणांचा मृत्यू झाला आहे. ब्यूबोनोयर शहरातील आरोग्य यंत्रणेने याबाबतची माहिती दिली आहे. या प्लेगमुळे शरीरातील अवयव निकामी होत रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे. सुरक्षेसाठी आणि ही साथ पसरु नये, यासाठी हे दोन रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

मृत रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये अद्याप प्लेगचे कोणतेही लक्षण आढळले नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. चीनच्या उत्तर भागासह इतर ठिकाणीही काही रुग्णांमध्ये प्लेगची लक्षणे आढळली आहेत. बाओटो शहरात गुरुवारी एका रुग्णांचा मृत्यू अनाकलनीय आजारामुळे झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याल प्लेग असण्याची शक्यता व्रतवण्यात येत आहे. तसेच जुलै महिन्यात पश्चिम मंगोलियात एका 15 वर्षांच्या मुलाचा ब्युबोनिक प्लेगमुळे मृत्यू झाला होता. मरमॅट जनावराचे मांस खाल्ल्याने त्याला प्लेगची लागण झाल्याची शक्यता चीनच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे.

प्लेग पसरत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलत प्लेगच्या फैलावाला पायबंद घातल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही काही रुग्णांमध्ये प्लेगची लक्षणे आढळत आहेत. तसेच आता आठवड्याभरात प्लेगमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्लेगचा फैलाव वाढत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीनमध्ये प्लेगचा अखेरचा उद्रेक 2009 मध्ये झाला होता. त्यावेळी तिबेटच्या पठाराजवळील निकेतन शहरात हजारो लोकांचा प्लेगने बळी घेतला होता.

आतापर्यंत जगभरात तीनवेळा प्लेगच्या साथीचा उद्रेक झाला आहे. पहिल्या उद्रेकात पाच कोटी लोकांचा बळी गेला होता. दुसऱ्या साथीत युरोपमधील एकतृतीयांश जनता मृत्यूमुखी पडली होती. तर तिसऱ्या साथीत 80 हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही जगातल्या विविध देशात प्लगचे रुग्ण आढळत असतात. या रोगाला योग्यवेळी पायबंद घालणे गरजेचे असते. उंदीरांमुळे हा रोग पसरतो. तसेच याचा फैलाव झपाट्याने होतो. ताप, अंगदुखी ही प्लेगची प्रथामिक लक्षणे असून त्यानंतर शरीरावर गाठी येतात. त्या 14 दिवसात पिकून रुग्णांचा मृत्यू होतो. आता पुन्हा ही जीवघेणी साथ चीनमधून पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या