
उत्तर प्रदेशच्या जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री दिनेश खाटिक योगी सरकारमधून राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळानं या वृत्ताचं खंडन केलं आहे. PWD मंत्री जितिन प्रसाद हे देखील त्यांच्या OSD बदलीमुळे सरकारवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.
खाटिक त्यांच्या विभागातील बदल्या आणि हस्तिनापूरमधील त्यांच्या समर्थकांवर एफआयआरमुळे नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. विभागाचे प्रमुख मंत्री स्वतंत्र देव सिंह आहेत. खाटिक यांनी त्यांचं अधिकृत निवासस्थान आणि वाहन सोडून हस्तिनापूर येथील त्यांच्या वैयक्तिक निवासस्थानी राहायला गेले असल्याची माहिती मिळते आहे.
नवनीत सहगल यांनी खाटिक यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला अफवा असल्याचं म्हटलं आहे.
सूत्रांनी सांगितलं की, PWD मंत्री जितिन प्रसाद हे देखील त्यांचे OSD अनिल कुमार पांडे यांच्या बदलीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर नाराज आहेत, ज्यांना राज्यानं केंद्राकडे परत पाठवलं आहे.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही मंत्र्यांचे फोन बंद होते.
मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्रा, अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी आणि अतिरिक्त मुख्य सचिव साखर उद्योग आणि उत्पादन शुल्क संजय आर भुसरेड्डी यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय चौकशी समितीने या महिन्याच्या सुरुवातीला योगी आदित्यनाथ सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागावर कारवाई केली. पैशाच्या बदल्यात अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, असं सांगितलं जात असून पॅनेलनं आपल्या चौकशी अहवालात अनिल कुमार पांडे याला दोषी ठरवलं.
जितिन प्रसाद बुधवारी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन तपासाबाबत बोलण्याची शक्यता आहे.
जितिन प्रसाद मंगळवारी योगी मंत्रिमंडळाच्या बैठकीत होते पण ते मीडियासमोर आले नाहीत.

























































