
बॅंकॉक येथून बेकायदेशीरपणे जिवंत प्राणी घेऊन आलेल्या एका प्रवाशाला चेन्नई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी चेन्नई विमानतळावर या प्रवाशाच्या बॅगेतून दुर्मीळ प्रजातीचे 23 प्राणी जप्त केले. यामध्ये 1 डिब्रेजा माकड, 15 किंग साप, 5 बॉल अजगर आणि 2 एल्डब्रा कासव सापडले आहेत. हा प्रवासी 11 ऑगस्टला बँकॉकहून आला होता. गुरुवारी कस्टम अधिकाऱ्यांनी गुप्तचर माहितीच्या आधारे त्याला अटक केली.
प्रवाशाने या जिवंत प्राण्यांना अवैधरित्या हिंदुस्थानात आणले होते. दरम्यान तस्करी करण्यात आलेल्या या प्राण्यांना Animal Quarantine and Certification Service यांच्या सल्ल्याने थाय एअरवेजने त्यांच्या मूळ देशात पाठवण्यात आले आहे. या प्रवाशावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असून. त्याला चेन्नईच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे.






























































