
अंड उकडून खायला बऱ्याच जणांना आवडतं. बरेच जण अंड्याचे ऑमलेट बनवून खातात, काहींना भुर्जी खायला आवडते तर काही जणांना अंड्यापासून तयार केलेल्या विविध प्रकारचे पदार्थ खाण्याची आवड असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, उकडलेले अंडे न खाता फक्त जपून ठेवले तर काय होईल? नुकत्याच आलेल्या एका बातमीवरून याविषयी माहिती मिळाली आहे.
ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका वृत्तानुसार, एका चिनी महिलेने 20 वर्षांपूर्वी उकडलेलं अंडं वर्षानुवर्षे जपून ठेवले होते. काही वर्षांनी या ते अंड वेगळेच दिसू लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला एका मौल्यवान दगडाचे स्वरुप प्राप्त झाले. या अंड्याचे छायाचित्र बघून लोकं आश्चर्यचकित होत आहेत.
या महिलेचे आडनाव फू आहे. काही वर्षांपूर्वी तिने चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Daoban वर या अंड्याचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा काही वृत्तवाहिन्यांनीही महिलेशी संपर्क साधला आणि अंड्याची कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी या महिलेने सांगितले की, ती जेव्हा शाळेत जात होती. तेव्हा तिच्या आईने तिच्याकरिता एक अंड विकत घेतलं होतं. ते अंड आकाराने फारच लहान होते. तिच्या आईने एक दिवस ते अंड उकडून तिला शाळेत जाताना खाण्याकरिता दिले होते. तिने ते अंड तिच्या पिशवीच्या एका वेगळ्या कप्प्यात ठेवले होते. मात्र हे तिच्या लक्षात आले नाही. 3 दिवसांनी जेव्हा तिने ते अंड बघितले तेव्हा तिला वाटलं की, ते खराब झाले असेल. पण तेव्हा तिने ते फेकून देण्याऐवजी फ्रीजमध्ये ठेवून दिले. दोन-तीन महिन्यांनी, मुलीच्या आईने पाहिले की, हे अंड खराब होऊ लागले आहे. आश्चर्य म्हणजे खराब होण्याऐवजी त्याचा रंग लाल झाला होता शिवाय ते चमकू लागले होते. यामुळे मुलीच्या आईने ते दागिन्यांच्या बॉक्समध्ये जपून ठेवले.
काही वर्षांनी फू आपल्या आईवडिलांसोबत घराबाहेर गेली होती. तेव्हा तिला आणि तिच्या आईला अंड्याचा विसर पडला होता. काही दिवसांपूर्वी तिची आई घर साफ करत असताना तिने ते अंड बघितले. ते पूर्णपणे लाल रंगाचे झाले होते शिवाय ते चमकत होते आणि त्यावर रेषा होत्या. ते दिसायला प्लास्टिकसारखे दिसत होते, पण त्याची चमक आणि लाल रंग यामुळे ते माणिकसारख्या मौल्यवान रत्नाप्रमाणे दिसत होते.




























































