आज दिसणार दशकातील पहिला ‘सूपरमून’; चंद्र 14 पटींना मोठा दिसणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2020 या वर्षात एकूण 13 पोर्णिमा येत आहेत. त्यातील 9 फेब्रुवारीला होणारी पोर्णिमा खूप महत्त्वाची आहे. या दिवशी दशकातील पहिला ‘सूपरमून’ दिसणार असल्याचे खगोलतज्ज्ञांनी सांगितले. ‘सूपरमून’च्या वेळी चंद्र इतर वेळेपेक्षा मोठा आणि जास्त चमकदार दिसतो.पाश्च्यात्य खगोलतज्ज्ञांनी याला ‘स्नो मून’ असे नाव दिले आहे. चंद्राचे पृथ्वीपासूनचे सरासरी अंतर 4,06,692 किलोमीटर आहे. त्याला ‘अपोजी’ म्हणातात. तर चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा हे अंतर 3,56,500 किलोमीटर असते. त्याला ‘पेरिजी’ म्हणतात. ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ ‘पेरिजी’मध्ये असतो, तेव्हा ‘सूपरमून’ दिसतो.

‘सूपरमून’च्या वेळी चंद्राचा आकार 14 पटींनी मोठा दिसतो. तर चंद्राची चमक 30 पटींनी वाढलेली दिसते. ‘सूपरमून’ असतो, याची पहिली माहिती 1979 मध्ये मिळाल्याचे ‘नासा’ने सांगितले. अंतराळतज्ज्ञांनी याला ‘पेरीजीन सूपरमून’ असे नाव दिले. या वर्षात 9 फेब्रुवारीला दशकातील पहिला ‘सूपरमून’ दिसणार असून त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातही ‘सूपरमून’ दिसणार आहे. त्यानंतर या वर्षात ‘सूपरमून’ दिसणार नाही. शुक्रवारी संध्याकाळपासून सोमवारी संध्याकाळपर्यंत ‘सूपरमून’ पहाता येणार आहे. मात्र, रविवारी ‘सूपरमून’चे दृश्य वेगळेच दिसणार असल्याचे खगोलतज्ज्ञांनी सांगितले. विविध देशात वेगवेगळ्या वेळी सूपरमूनचे दर्शन होणार आहे. पश्चिमेकडील देशात रात्री 1 वाजून 03 मिनिटांनी ‘सूपरमून’ दिसणार आहे. मात्र, हिंदुस्थानात यावेळी सूर्योदय होत असल्याने हिंदुस्थानात ‘सूपरमून’ दिसण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ‘नासा’सह काही संस्था याचे ऑनलाईन प्रक्षेपण करणार असल्याने सूपरमून ऑनलाईनद्वारे पाहता येणार आहे.

चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असला तरी 9 फेब्रुवारीला ‘सूपरमून’ दिसणार नसल्याचे काही खगोलतज्ज्ञांनी सांगितले. या दिवशी फूलमूनपेक्षा चंद्र मोठा दिसेल. मात्र, तो ‘सूपरमून’ नसेल असे काही तज्ज्ञांनी सांगितले. 9 फेब्रुवारीला चंद्र इतर पोर्णिमेपेक्षा मोठा दिसणार असला तरी तो एक फूलमून आहे. तो सूपरमून नाही, असे खगोलतज्ज्ञ रिचर्ड नॉले यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, ‘नासा’सह इतर देशांच्या अंतराळ संस्थाना या ‘सूपरमून’बाबत उत्सुकता आहे.