2021 मधील आयपीएलही यूएईत? बीसीसीआय-ईसीबीमध्ये चर्चा

कोरोनामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा यूएईतील तीन ठिकाणी खेळकण्यात येत आहे. आता 2021 सालातील म्हणजेच सहा महिन्यांनंतर होणारी आयपीएल स्पर्धा यूएईतच होण्याचे संकेत मिळाले आहेत. हिंदुस्थानातील कोरोनाचा प्रभाक अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळकण्यात अपयश आल्यास आयपीएल स्पर्धा यूएईतच होईल. बीसीसीआय व इमिरात क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त मीडियामधून प्रसिद्ध होत आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली, सेक्रेटरी जय शहा आणि इमिरात क्रिकेट बोर्डचे व्हाईस चेअरमन खालीद झारूनी यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. बीसीसीआयने आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ हेही यावेळी उपस्थित होते.

पुढील सहा महिन्यांमध्ये हिंदुस्थानात इंग्लंडविरुद्धची मालिका व आयपीएल या दोन महत्त्वाच्या मालिका होणार आहेत. हिंदुस्थानातील परिस्थितीमध्ये सुधार झाला नाही तर आयपीएलसह इंग्लंडविरुद्धची मालिकाही यूएईत पार पडणार आहे. यूएईतील अबुधाबी, शारजा व दुबई येथील स्टेडियम्समध्ये या लढतींचे आयोजन करण्यात येऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या