2021 च्या दिव्यांग विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद हिंदुस्थानला

387


नुकतेच दिव्यांगांच्या विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंसह सर्व क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची खबर हिंदुस्थानी संघाचे संचालक विनोद देशपांडे यांनी दिली. 2021च्या टी-20 विश्वचषकाचे यजमानपद हिंदुस्थानला बहाल करण्यात आल्याचे देशपांडे यांनी शुक्रवारी घोषित केले.

गेल्या महिन्यात दिव्यांगांच्या पहिल्यावहिल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम लढतीत हिंदुस्थानने यजमान इंग्लंडलाच 36 धावांनी धूळ चारून विजेतेपद मिळवले होते. मुंबईत शुक्रवारी या विश्वविजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी महिला क्रिकेटपटू डायना एडल्जी आणि माजी क्रिकेटपटू करसन घावरी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

‘बीसीसीआय’तर्फेही लवकरच विश्वविजेत्यांचा गौरव -एडुल्जी
हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने( बिसीसीआय )दिव्यांग क्रिकेट संघाच्या कामगिरीची दखल घेतली असून लवकरच या सर्व खेळाडूंचा रोख पारितोषिके देऊन गौरव केला जाईल, असे डायना एडुल्जी म्हणाल्या. ‘‘प्रशासकीय समितीची सदस्य म्हणून मी ‘बीसीसीआय’कडे अपंग खेळाडूंच्या विकासासाठी अर्ज केला होता. त्यामुळे आता सर्व खेळाडूंचा रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात येईल,’’ असे एडल्जींनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या