विधानसभा निवडणुकीतील संपूर्ण मतदानाच्या अहवालाच्या मतदारसंघनिहाय प्रती द्या, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
state election commission maharashtra

2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाबाबतच्या संपूर्ण अहवालाच्या 288 मतदारसंघनिहाय प्रती देण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसने आज निवडणूक आयोगाकडे केली.

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. संदेश कोंडविलकर यांनी आज मंत्रालयात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. मतदानाची प्रक्रिया पार पडली की निवडणूक निर्णय अधिकारी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना अहवाल सादर करतात. त्याला परिशिष्ट 44 असे म्हटले जाते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान आणि त्यानंतर जाहीर करण्यात आलेली आकडेवारी यामध्ये मोठी तफावत दिसून आली होती. त्यासंदर्भात काँग्रेससह अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी शंका उपस्थित केल्या होत्या आणि तक्रारीही केल्या होत्या. त्या तफावतीमुळे व्होटचोरीचा नवा पॅटर्न राज्यात राबवण्यात आला, अशी जनभावना आहे. परिशिष्ट 44 च्या प्रती मिळाल्या तर त्यातील वास्तव समोर येऊ शकेल, असे कोंडविलकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

अहवालात समाविष्ट बाबी

 मतदान केलेल्या मतदारांची संख्या

 एकूण मतदानाची टक्केवारी

 मतदान केव्हापर्यंत चालले त्याची निश्चित वेळ

 टक्केवारीतील चढउतार

 बाद ठरवण्यात आलेल्या मतांची संख्या

 जप्त झालेले डिपॉझिट

 कोणते उमेदवार स्वतःच आपले इलेक्शन एजंट होते

 पोलिंग एजंटची संख्या

 मतदान यंत्रांची व व्हीव्हीपॅटची संख्या

 अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी राजकीय पक्षात प्रवेश करणारे अपक्ष उमेदवार

 उमेदवारी मागे घेतलेले उमेदवार