
अमरावती जिल्ह्यात आज कोरोनाचे 22 रुग्ण सापडले आहेत. त्यात दोन पोलीस कर्मचार्यांचाही समावेश आहे. दररोज तुलनेत आज कोरोनाबाधिताची संख्या कमी असली तरी उशिरा रात्री येणार्या अहवालात पुन्हा हा आकडा वाढणाची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 3 हजार 951 वर पोहचली आहे.
आज आलेल्या एकुण 22 कोरोनाबाधितापैकी 2 पोलीस कर्मचार्यांना समावेश आहे. हे पोलीस कर्मचारी गाडगेनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. दरम्यान आज ग्रामीण भागात नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. मात्र आज आढळुन आलेले हे सर्व रुग्ण अमरावती शहरातील वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहे. आतापर्यंत 2 हजार 630 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 99 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.



























































