तरुणावर चौघांचा सामूहिक बलात्कार, आरोपी गजाआड

4525

चौघा तरुणांनी मिळून एका 22 वर्षीय तरुणावर कारमध्ये आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची घटना विद्याविहार परिसरात 8 डिसेंबरच्या रात्री घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच विनोबा भावे पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून त्या चारही आरोपींना बेडय़ा ठोकल्या. त्यापैकी एक अल्पवयीन मुलगा असून त्याची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात केली आहे.

इम्रान (22, नाव बदललेले) हा तरुण गेल्या रविवारी कुर्ला पश्चिमेकडील नवाब सिख पराठा येथे सिख खाण्यासाठी थांबला होता. त्यावेळी दोन तरुण तेथे आले आणि तू इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहेस. आम्ही तुला ओळखतो असे बोलून ओळख वाढवू लागले. त्यानंतर ते दोघे त्यांच्या स्कूटीवर बसवून इम्रानला सोबत घेऊन गेले.   विद्याविहार रेल्वे स्थानकाबाहेरील नीलकंठ बिझनेस पार्पजवळ एका कारमध्ये इम्रानला जबरदस्ती घेऊन गेले.  त्या ठिकाणी चौघांनी आळीपाळीने इम्रानवर बलात्कार केला.  मग त्यांनी इम्रानच्या क्रेडिट कार्डवरून दोन हजारांचे पेट्रोल भरले. तसेच दोन हजार रोकड काढून घेतली. त्यानंतर थोडय़ा अंतरावर गेल्यानंतर आरोपींनी इम्रानला कारमधून बाहेर फेकून पळ काढला.

विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक माधुरी पाटील, उपनिरीक्षक साळुंखे तसेच धनाजी काशिद, राजेश राठोड, संदीप पाटील, अजय बोटे आणि अनिल शिंदे या पथकाने पीयूष चौहान (23), मेहुल परमार (21), असिफअली अन्सारी (24) या तिघांसह चौथ्या अल्पवयीन आरोपीला बेडय़ा ठोकल्या.

 

आपली प्रतिक्रिया द्या