शेजारी देश 14…तरीही 23 देशांशी सीमावाद..असा आहे विस्तारवादी ड्रॅगन…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनचे विस्तारवादी धोरण जगाला आता चांगलेच माहित झाले आहे. हिंदुस्थानशी चीनमध्ये सीमावादामुळे तणाव निर्माण झाल्याने चीनचे विस्तारवादी स्वरूप पुन्हा जगसमोर आले आहे. चीनच्या सीमा 14 देशांना लागत आहेत म्हणजे चीनला 14 शेजारी देश असूनही आपल्या सीमा 23 देशांशी लागत असल्याचा चीनचा दावा आहे. त्यामुळे चीनचा 23 देशांशी सीमावाद सुरू आहे.चीनच्या विस्तारवादी धोरणाने जगातील 23 देश त्रासले आहेत.

दक्षिण चीनच्या समुद्रातील काही बेटांवर ब्रुनेईचा ताबा आहे. मात्र, चीनने या बेटांवर दावा केला आहे. मिंग राजवंशाचा विस्तार (1368-1644) कंबोडियापर्यंत होता. त्यामुळे दक्षिण चीन समुद्रातील बेटांसह चीन कंबाडियाच्या काही भागावर आपला दाा सांगत आहे. तसेच इंडोनेशियाच्या ताब्यातील काही भागवरही चीनने दावा केला आहे. मिंग राजवशांची सत्ता असलेली ब्रुनेईच्या ताब्यातील बेटे, कंबोडिया, इंडोनेशिया चीनचाच असल्याचा दाव नेहमी करण्यात येतो. चीनची रशियाशी 1,60,000 वर्ग किलोमीचरची सीमा जोडलेली आहे. या सीमाभागावरही चीनने दावा केला आहे. हा वाद सोडवण्यासाठी दोन्ही देशात अनेकदा करार झाले आहेत. मात्र, आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. तैवान चीनच्या गणराज्याचा भाग आहे. मात्र, चीनच्या गणराज्यात राहण्यात तैवानचा विरोध आहे. दक्षिण चीन सागरातील मालकी हक्कावरून चीनचा सिंगापूरसोबत वाद आहे. आपल्य सागरी हद्दीत चीनकडून मासेमारी करण्यात येत असून सिंगापूरकडून त्याचा विरोध करण्यात येतो.चीन आणि पाकिस्तानची मैत्री जगजाहीर असली तरी दोन्ही देशातील सीमावादही अनेक वर्षांपासून सुरू आहे. इकोनॉमिक कॉरिडॉरच्या नावाखाली मोठा भूभागावर ताबा मिळवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. सीमावादातून चीनचे व्हिएतनामसोबत युद्धही झाले आहे. व्हिएतनामवर मिंग राजवंशाची होती. त्यामुळे व्हिएतनाम आपलाच असल्याचा चीनचा दावा आहे. म्यानमारसोबतही चीनचा सीमावाद सुरू आहे. 1271 ते 1368 या काळात चीनच्या युआन राजवंशाची सत्ता म्यानमारवर होती. त्याचा दाखल देत चीन म्यानमारच्या मोठ्या भूभागावर दावा करत आहे.

नेपाळच्या मोठ्या भूभागावर चीनने दावा केला आहे. नेपाळ हा तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनचा दावा आहे. तिबेट चीनचा आहे. त्यामुळे नेपाळचा हा भूमभागही चीनचाच आहे, असा दावा चीनने केला आहे. 1788-1792 चीन-नेपाळ युद्धापासून दोन्ही देशात हा वाद आहे. हिंदुस्थासोबतही चीनचा सीमावाद आहे. अनेकदी चीनने हिंदुस्थानी क्षेत्रात घुसखोरी केली आहे. तसेत 1962 मध्ये दोन्ही देशात युद्धही झाले आहे. मात्र, अद्यापही वाद सुरूच आहे. भूतानच्या भूभागही चीनने ताब्यात घेतला आहे. या भागात चीन रस्तेबांधणी आणि इतर विकासकामे करत आहे. तसेच सीमारेषेवर चीनने बंकरही बनवले आहेत. अफगाणीस्तानसोबतही चीनचा वाद असून 1963 मध्ये झालेल्या करारानंतरही अफगाणीस्तानच्या मोठ्या भूभागावर चीन दावा सांगत आहे. या भागात चीनचे सैन्य गस्तीवर असून चिथावणी देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. 19 व्या शतकात झालेल्या एका युद्धात कर्जिगिस्तानचा भाग आपण जिंकल्याने तो आपलाच असल्याचा चीनचा दावा आहे. तर कजाखस्तानसोबत असलेला सीमवादाचा निकाल चीनच्या बाजूने गेला आहे. दक्षिण कोरियावर चीनच्या युआन राजवंशाी सत्ता होती. त्यामुळे दक्षिण कोरियावर आपला ताबा असल्याचा चीनचा दावा आहे. चीनच्या किंग राजवंशाची सत्ता (1644-1912)तजाकिस्तानवर होती. त्यामुळे हा भागही आपला असल्याचा चीनचा दावा आहे. त्यामुळे चीनच्या विस्तारवादी धोरणाने जगातील 26 देश त्रस्त झाले आहेत.