विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी-विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-विद्याविहार दरम्यान धिम्या मार्गावर धावणाऱया लोकल जलद मार्गावर धावतील. हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी/वडाळा ते वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव लोकल रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत सीएसएमटी-वांद्रे, सीएसएमटी/पनवेल – गोरेगाव आणि चर्चगेट-गोरेगाव दरम्यानच्या काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.