नगर जिल्ह्यात 23 जण कोरोना पॉझिटिव्ह; 15 रुग्णांची कोरोनावर मात

421

नगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये सोमवारी 23 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नगर शहरातील 15, श्रीगोंदा येथील 7 आणि पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 315 इतकी झाली आहे. तर 15 जणांनी कोरोनावर मता केल्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 649 इतकी झाली आहे.

कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील 1, श्रीगोंदा येथील झेंडा चौक येथील 5 तसेच श्रीगोंदा शहरातील एक आणि तालुक्यातील वडळी येथील एक जण कोरोनाबाधित आढळून आला आहे. नगर शहरात गवळी वाडा येथील 9, चितळे रोड 1, झेंडी गेट1 आणि शहराच्या मध्यवस्तीत 4 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण 315 आहेत. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 649 झाली आहे. आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 986 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या