आंध्रची 23 वर्षीय तरुणी अंतराळात जाणार, जान्हवी डांगेटीची टायटन्स स्पेसच्या ऑर्बिटल मिशनसाठी निवड

आंध्र प्रदेशची रहिवासी असलेली जान्हवी डांगेटी या तरुणीची टायटन्स स्पेसकडून 2029 मध्ये होणाऱया ऑर्बिटल फ्लाईटसाठी निवड करण्यात आली आहे. जान्हवी अवघ्या 23 वर्षांची असून ती या मिशनमध्ये अंतराळवीर सदस्य म्हणून सहभागी होणार आहे. हे मिशन पाच तास लांब असेल ज्यात तीन तास लागोपाठ झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव मिळेल. जान्हवी 2026 पासून एस्कान प्रोग्रामांतर्गत तीन वर्षांचे प्रशिक्षण घेणार आहे. या मिशनसाठी माझी निवड करण्यात आल्याने मी खूपच आनंदी आहे, मला आता भारी वाटत आहे, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. टायटन्स स्पेसचे हे ऐतिहासिक मिशन 2029 मध्ये लाँच केले जाणार आहे. यात अंतराळ प्रवासी दोन वेळा पृथ्वीची परिक्रमा करतील. त्यामुळे ते दोन वेळा सूर्योदय आणि दोन वेळा सूर्यास्त असे दुर्मिळ दृश्य पाहू शकतील. या मिशनचे नेतृत्व नासाचे अनुभवी अंतराळ प्रवासी विल्यम मॅकऑर्थर ज्युनिअर करतील. जान्हवी नासाच्या इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राममध्ये निवड झालेली पहिली हिंदुस्थानी महिला आहे.