
उत्तर प्रदेशातील कासगंज येथे तलावात ट्रक्टर ट्रॉली उलटल्याने या दुर्घटनेत 24 जणांना मृत्यू झाला आहे. या ट्रॉलीमध्ये एकूण 54 लोक बसले होते. बुलडोझरच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. माघी पौर्णिमेनिमित्त कासगंजमधील कादरगंज घाटावर स्नान करण्यासाठी हे सर्व जण ट्रक्टरच्या ट्रॉलीतून जात होते. रियावगंज पटियाली मार्गावरील गधई गावाजवळ आल्यानंतर ट्रक्टर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक्टर रस्ता सोडून तलावात पडले. ट्रक्टरमधील सर्व लोक एटा येथील जैथरा येथील रहीवासी आहेत. भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

























































