मराठवाड्यातील 261 संशयित रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठवले

662

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तरी देखील आरोग्य विभाग डोळ्यांत तेल घालून रुग्णांची तपासणी करीत आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार चार जिल्ह्यातील 261 कोरोना संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्हीच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 228 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 25 जणांचे सॅम्पल रिजेक्ट झाले असून 8 जणांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याची माहिती डाँ. गणेश कल्याणकर यांनी दिली.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. परंतु मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही. एकही रुग्ण आढळून आला नसलातरी आरोग्य विभागाच्या वतीने काटेकोरपणे काळजी घेतली जात आहे. संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यातील आरोग्य विभागाने आतापर्यत 261 कोरोना संशयित रुग्णांचे स्वँब घेऊन तपासणीसाठी  पाठवले असता त्यापैकी 228 जणांचे निगेटिव्ह तर 25 रुग्णांचे सँम्पल रिजेक्ट केले. उर्वरीत ८ जणांचा अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे डाँ. गणेश कल्याणकर यांनी सांगितले.

संभाजीनगरात 97 जणांचे नमुने घेतले

संभाजीनगरमधील घाटी रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात आतापर्यत 97 संशयित रुग्णांचे स्वँब तपासणीसाठी पाठवले असता 86 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून अकरा जणांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मराठवाड्यात कोरोनाची लागण झालेली नसल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या