मालीच्या आर्मी बेसवर दहशतवादी हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माली देशाच्या आर्मी बेसवर शुक्रवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 27 जवान ठार झाले असून 33 जण जखमी झाले आहेत. यावेळी जवानांनी केलेल्या कारवाईत 70 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. मात्र सदरचा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने केला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. माली आणि बुर्किना सीमेवर मोंडोरो येथे मालीचा आर्मी बेस असून शुक्रवारी येथे 150 जवान होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात जवानांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी जवानांपैकी 21 जवानांची प्रकृती गंभीर आहे, तर 7 जवान अद्यापही बेपत्ता आहेत. दहशतवाद्यांनी आर्मी बेस उडवण्यासाठी वार बॉम्बचा वापर केला होता. दरम्यान, दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनी सडेतोड उत्तर दिले आहे. या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीवारली नसली तरी अल कायदा आणि इसिसवर संशय आहे.