गोव्यात कोरोनामुळे दिवसभरात तिघांचा मृत्यू; बळींचा आकडा 32 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. गोव्यात कोरोनामुळे दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गोव्यात कोरोनामुळे आतापर्यंत 32 जणांचा बळी गेला आहे.

चोडण येथील 80 वर्षीय महिला कोरोनाचा 30 वा बळी ठरली आहे. तिचे शनिवारी पहाटे कोविड रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर वास्को येथील 65 वर्षीय महिलेचे कोविड रुग्णालयात निधन झाले. तो कोरोनाचा 31 वा बळी ठरला. साखळी येथील 85 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तो दिवसभरातील तिसरा बळी ठरला. त्यामुळे एकूण बळींची संख्या 32 वर पोहचली आहे.

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 4 हजार 540 रुग्ण सापडले असून त्यातील 2 हजार 865 बरे झाले आहेत. सध्या 1 हजार 646 रुग्ण उपचार घेत असून मृतांचा आकडा 32 वर पोचला आहे. मृतांमध्ये प्रामुख्याने मूरगाव तालुक्यातील रुग्ण आहेत. त्यामुळे तेथे चितंचे वातावरण आहे.