
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यात 3 दिवस दारु विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे त्यामुळे दिनांक 19 ते 21 ऑक्टोबर असे सलग 3 दिवस ड्राय डे राहणार आहे.
त्याचप्रमाणे मतमोजणी ही 24 ऑक्टोबर रोजी होणार असल्याकारणाने त्या दिवशी संपूर्ण दिवस दारू विक्रीवर बंदी राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी काढले आहेत. निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात व शांततेत पार पाडण्यासाठी ही बंदी घालण्यात आलेली आहे.


























































