बीड जिल्ह्यातील 3 लाख 3900 शेतकऱ्यांना कर्जमाफी; 2 हजार 350 कोटी होणार माफ

660

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीत बीड जिल्ह्यातील 3 लाख 3925 शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. यातील 2 लाख 95 हजार 233 शेतकऱ्यांचे आधार कार्ड अकाऊंटला लिंक झाले आहेत. 8 हजार 692 आधार कार्ड अद्याप लिंक झालेले नाहीत. आधारकार्ड लिंक झालेल्या शेतकऱ्यांची टक्केवारी 97.14 एवढी आहे. बीड जिल्ह्यातील 3 लाख 3925 शेतकऱ्यांचे तब्बल 2 हजार 350 कोटी रूपयांचे कर्ज माफ होणार आहे.

राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. जाहीर केलेल्या योजनेमध्ये बीड जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 3925 शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. यातील 2 लाख 95 हजार 233 शेतकऱ्यांचे आधार कार्ड अकाऊंटला लिंक झाले आहेत. केवळ 8692 शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंक व्हायचे राहिले आहेत. 2 लाख 81 हजार 142 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्यात आला आहे. आधार कार्ड लिंक झालेल्या शेतकऱ्यांची सरासरी 97.14 एवढी आहे. जिल्ह्यातील दोन गावामध्ये आधार प्रमाणिकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. तेलगाव आणि नित्रुड या दोन गावांची यात निवड झाली आहे. सोमवारी लाभार्थ्यांना आधार प्रमाणिकरण पावती देण्यात आली. या दोन्ही गावातील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्राम पंचायतीत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या पोर्टलवरही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. एका दिवसात 182 लाभार्थ्यांचे प्रमाणिकरण झाले आहे. नित्रुड आणि तेलगाव या दोन ग्राम पंचायतमधील पात्र लाभार्थ्यांच्या ग्राम पंचायत स्तरावर याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. संबंधित पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी प्रमाणिकरण आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या