बीड जिल्ह्यात 3 नवे रुग्ण; 186 अहवाल कोरोना निगेटिव्ह

489

बीड जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे नवे तीन रुग्ण आढळले आहेत. सोमवारी 197 जणांचे सॅम्पल तपासण्यात पाठवले होते. त्यात 186 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले तर तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा 152 पर्यंत पोहोचला आहे. बीड जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र, आता जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ संथगतीने होत आहे.

बीड जिल्ह्यात सोमवारी 197 जणांचे सॅम्पल स्वारातीमध्ये तपासण्यात आले. त्यात 186 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत. तर तीन जणांना कोरोनाचे संक्रण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 8 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 152 वर पोहोचली आहे त्यात 113 जण घरी परतले आहेत. तर 35 जण उपचार घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या