टेम्पोतून दारुची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक; 144 लिटर दारु जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेम्पोमधून बेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 144 लिटर दारु आणि टेम्पो असा एकूण 5 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवम उर्फ शिवा गणेश माने ( वय 22) , संग्राम उर्फ बाळा गणेश माने (वय 21) आणि शुभम उर्फ शुभ्या अच्युत माने (वय 23, रा. आण्णाभाऊ साठे वसाहत, अप्पर बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

स्वारगेट पोलिसांकडून गस्त सुरु असताना पोलीस कर्मचारी ज्ञाना बडे आणि मनोज भोकरे यांना टेम्पोतून अवैधरित्या हातभट्टी दारू वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली टेम्पोचा शोध घेण्यात आला. त्यावेळी दारुची वाहतूक करणाऱ्या तिघांना डायसप्लॉटकडे जाताना पकडले. त्यांच्याकडून 144 लिटर हातभट्टी दारु आणि टेम्पो जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, ज्ञाना बडे, मनोज भाकरे यांच्या पथकाने केली.