तामीळनाडूत 300 दलितांचा मंदिरात प्रवेश 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामीळनाडूमधील थेनमुडियानूर गावातील 300 दलितांना मंदिरात पूजा करण्याची संधी देण्यात आली. गेल्या 200 वर्षांपासून तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील या मंदिरात दलितांना जाण्यास बंदी होती. गावातील काही लोकांचा त्यांच्या मंदिरात प्रवेशाला विरोध असून परिस्थिती चिघळू नये, यासाठी मंदिराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, जातीप्रथेविरोधात सुरू असलेल्या लढाईमुळे समाजातील भेदभाव नष्ट होण्यास मदत होईल, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.