गाझात इस्रायलचा हवाई हल्ला, 32 ठार

गाझामध्ये इस्रायलने शनिवारी मोठा हवाई हल्ला केला. यामध्ये 32 लोकांचा मृत्यू झाला. युद्धविराम व्हावा यासाठी इस्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असताना इस्रायलने हा हवाई हल्ला केला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्रात भाषण केल्यानंतर त्याच मध्यरात्री हा जोरदार हल्ला करण्यात आला. मध्य आणि उत्तर गाझात शनिवारी केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक लोक मारले गेले आहेत. नुसेरात येथील आश्रय घेतलेल्या शिबिरात एकाच कुटुंबातील 9 लोकांचा मृत्यू झाला आहे.