दिलासादायक; दिवसभरात 34370 रुग्ण बरे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रुग्णसंख्येबाबत आज दिलासादायक बातमी मिळाली. गुरुवारी दिवसभरात 21 हजार 273 नवे रुग्ण सापडले; पण त्याचवेळी दिवसभरात 34,370 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यातील विविध जिल्हय़ांमधील सक्रीय रुग्णसंख्याही घटत आहे. सध्या हा आकडा 3 लाख 14 हजार 368 एवढा आहे. राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 52 लाख 76 हजार 203 इतका झाला आहे. त्यामुळे रिकव्हरी रेटदेखील 93.02 टक्के इतका वाढला आहे.