लातूरमध्ये आढळले कोरोनाचे 346 रुग्ण, उपचारादरम्यान 6 रुग्णांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यात कोरोनाचे 346 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 10 हजार 472 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात 6 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

लातूर जिल्ह्यातील कोरोनाचा कहर थांबण्याचे चिन्ह दिसून येत नाही. दररोज कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 255 आरटीपीसीआर टेस्टमध्ये 76 जण पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. तर 1243 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्टमध्ये 270 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. एकूण 346 रुग्ण वाढले असून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या यामुळे 10472 एवढी झालेली आहे.

लातूर जिल्ह्यात सध्या 2737 रुग्णावंर उपचार सुरु आहेत त्यामध्ये खाजगी रुग्णालयामध्ये 266 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 423  रुग्ण घरातच विलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत. उपचारादरम्यान आज 6 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आजपर्यंत 329 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यातील 212 रुग्ण उपचाराने बरे होऊन आज घरी परतले आहेत तर आजपर्यंत 7406 रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतलेले आहेत. सप्टेंबरच्या केवळ सात दिवसांमध्ये जिल्ह्यात 2360 रुग्णांची वाढ झालेली आहे.