बीड जिल्ह्याला दिलासा; 36 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह

559

बीडमधून शनिवारी रात्री उशिरा 38 जणांचे स्वॅब पाठवण्यात आले होते. त्यापैकी 36 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर दोन जणांचा निष्कर्ष आलेला नाही. जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर नवे रूग्ण आढळण्याचा वेग मंदावल्याने बीड जिल्ह्याला मोठा दिलासा मिळत आहे.

बीड जिल्ह्यामध्ये रविवारी कोरोनाबाधित रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शनिवारी तपासणीसाठी 38 स्वॅब पाठवण्यात आले होते. त्यातील 36 स्वॅबचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर दोन जणांचा अहवालात अद्याप निष्कर्ष निघालेला नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये कोरोना संक्रमणाची तीव्रता मर्यादीत असल्याचे दिसत आहे. कोरोनामुक्त जिल्ह्यासाठी आरोग्य विभाग मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार परिश्रम घेत असल्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश मिळत आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना रविवारी घरी पाठवण्यात आले. तर कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या शून्य असल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या