
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात मंगळवारी एका उच्चशिक्षित पीएचडी धारक तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 7 वाजता घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण विद्यापीठ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
राहुल मुकुंदराव सोनाळे (वय 38, रा. नवजीवन नगर, स्वयंवर मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, नवीन नांदेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, राहुल यांनी आज (7 जुलै 2026) सकाळी विद्यापीठ परिसरातील भाषा संकुलासमोर असलेल्या एका झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यापीठ परिसरात एकच गर्दी झाली.दरम्यान नांदेड ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून मृत व्यक्तीचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे



























































