इंडिगोची मोठी कारवाई, चार फ्लाईट ऑपरेशन अधिकाऱ्यांना केलं निलंबीत

इंडिगो एअरलाईन्सने गेल्या आठवड्यात झालेल्या गोंधळासाठी चार फ्लाईट ऑफरेशन अधिकाऱ्यांना निलंबीत केलं आहे. या चार अधिकाऱ्यांना इंडिगोच्या गोंधळासाठी जबाबदार ठरवत ही कारवाई करण्यात आली आहे. इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स यांची गुरुवारी डीजीसीएने सुमारे दोन तास चौकशी केली. त्यानंतर अल्हर्स यांनी ही कारवाई केली.

गेल्या दहा दिवसांपासून कोलमडलेली इंडिगो एअरलाईन्सची सेवा अजूनही सुरळीत झालेली नाही. आतापर्यंत इंडिगोची हजारो उड्डाणे रद्द झाली त्याचा प्रवाशांना भयंकर त्रास झाला. त्रस्त प्रवाशांना दहा हजार रुपयांचे अतिरिक्त ट्रव्हल व्हाऊचर देण्याची घोषणा कंपनीने केली.

10 हजार रुपयांचे व्हाऊचर कोणाला मिळणार?

3 ते 5 डिसेंबर या कालावधीत उड्डाणे रद्द झाल्यामुळे सर्वाधिक त्रास झालेल्या प्रवाशांना 10 हजार रुपयांचे अतिरिक्त ट्रव्हल व्हाऊचर मिळणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार विमान उडाल्यानंतर 24 तासांच्या आत तिकीट रद्द झाल्यानंतर मिळणाऱया 5 ते 10 हजार रुपयांच्या व्यतिरिक्त हे व्हाऊचर असेल, मात्र जास्त त्रास झालेले प्रवासी म्हणजे नेमके कोणते, हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. वर्षभरात ते व्हाऊचर प्रवाशांना वापरता येईल.