
सामना ऑनलाईन । रत्नागिरी
रत्नागिरीतील समुद्रात मच्छिमारांना जंबो वागळी मासे सापडले आहेत. साधारणपणे वागळी जातीचा मासा 50 ते 80 किलो वजनाचा असतो. मात्र रत्नागिरीच्या मिरकरवाडा येथील मच्छिमारांच्या जाळ्यात तब्बल 500 ते 600 किलो वजनाचे 4 मासे सापडले आहेत. हे महाकाय मासे उचलण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. त्यामुळे मिरकरवाडा बंदरात हे जंबो मासे पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
Video-अबब! 90 किलोचो मासो गावलो!
रत्नागिरीतील रऊल रफीक साखरकर यांच्या जाळ्यात एक-दोन नाही तर तब्बल 4 वागळी जातीचे महाकाय मासे सापडले. वातावरणातील बदलामुळे थंड हवामानाच्या काळात मोठे मासे उथळ पाण्याकडे येतात. त्यामुळे असे मोठे मासे मच्छिमारांच्या जाळ्यात सापडत असल्याचे येथील जाणकारांचे मत आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील हर्णै समुद्रात गोबरा जातीचा 90 किलोचा मासा सापडला होता.




























































