लातूरमध्ये आढळले कोरोनाचे 40 रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 537 वर

3433

लातूरमध्ये आज कोरोनाचे 40 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 537 वर पोहोचली आहे. लातूर जिल्ह्यात मंगळवारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थेच्या प्रयोगशाळेकडे जिल्ह्यातील 220 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलेले होते. रात्री उशीरा त्याचा अहवाल प्राप्त झालेला होता. 159 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले होते तर तब्बल 40 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले होते. 20 जणांचे अहवाल अनिर्णित आले तर एकाचा अहवाल रद्द करण्यात आलेला होता.

लातूर शहरामध्ये तब्बल 15 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेले आहेत. उदगीर येथील 3 रुग्ण पॉझिटीव्ह आलेले होते तर 4 जणांचे अहवाल अनिर्णित होते. अहमदपूर येथील 5 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह होते. निलंगा येथील 2 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह होते तर 3 जणांचे अहवाल अनिर्णित होते. एमआयडीसी  लातूर येथील 3 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर 2 जणांचे  अहवाल अनिर्णित आलेले होते. औसा येथील 8 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले होते तर 3 जणांचे अहवाल अनिर्णित होते. कासारशिरसी येथील 1 अहवाल पॉझिटीव्ह होता तर स्त्री रुग्णालयातील दोघांचे अहवालही पॉझिटीव्ह आलेले होते.

लातूर जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटीव्ह असणाNया रुग्णांची संख्या ही 537 वर पोहंचलेली आहे. तर उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ही तब्बल 298 वर पोहंचलेली आहे. 27 रुग्णांचे मृत्यूही झालेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या