
एका पुरुषाला किती बायका असू शकतात? पाच, दहा, पंधरा? बिहारच्या जाती आधारित जनगणनेदरम्यानचा एक खुलासा तुम्हाला चक्रावून टाकेल. रुपचंद असं या व्यक्तीचं नाव आहे, जो 40 महिलांचा पती आहे.
बिहारच्या अरवल जिल्ह्यातील रेड-लाइट एरियामध्ये सुमारे 40 महिलांनी रूपचंद नावाच्या व्यक्तीला आपला पती म्हणून नाव सांगितल्याचे जाती आधारित जनगणनेदरम्यान आढळून आले.
जनगणना अधिकाऱ्यांनी महिलांच्या मुलांना विचारले असता त्यांनीही त्यांच्या वडिलांचं नाव रूपचंद असंच लिहिलं.
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वॉर्ड क्रमांक 7 मधील रेड-लाइट एरियामध्ये राहणारे लोक उपजीविकेसाठी गाणे आणि नृत्य करतात आणि त्यांचा कोणताही निश्चित पत्ता नाही. त्यामुळे या महिलांनी आपल्या पतीचं नाव रूपचंद ठेवलं आहे. ही घटना आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
नितीश कुमार सरकारने 7 जानेवारी रोजी बिहारमध्ये जात-आधारित जनगणना सुरू केली. गणना प्रकल्पासाठी 500 कोटी रुपये खर्च येईल.
बिहार सरकार हा उपक्रम दोन टप्प्यात राबवत आहे. पहिल्या टप्प्यात सर्व घरांची मोजणी करायची होती. दुसऱ्या टप्प्यात सर्व जाती, पोटजाती आणि धर्मातील लोकांशी संबंधित डेटा गोळा केला जाणार होता.
प्रगणक, ज्यांचे प्रशिक्षण 15 डिसेंबरपासून सुरू झाले, ते सर्व लोकांच्या आर्थिक स्थितीची माहिती देखील नोंदवतील.




























































