महापालिकेची प्लास्टिक विरुद्ध कारवाई, ४०० किलो प्लास्टिक जप्त

7

सामना प्रतिनिधी, लातूर

लातूर शहरातील महानगर पालिकेच्यावतीने शहरातील विक्रेत्यांवर धाडी टाकण्यात आल्या. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करून ३५४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ४०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

लातूर शहर महानगर पालिकावतीने भुसार लाईन, भाजी मार्केट, सराफ गल्ली, गंज गोलाई परिसरातील प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करून ३५४०० रुपये दंड व ४०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. उपायुक्त हर्षल गायकवाड, सहाय्यक आयुक्त वसुधा फड, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, प्रमुख स्वच्छता निरीक्षक सूर्यकांत राऊत, धोंडीराम सोनवणे, रवी कांबळे, सहदेव बोराडे, हिरालाल कांबळे व कर्मचारी यांनी ही कारवाई केली .

प्लास्टिकचा वापर करत असल्याचे निदर्शनास आल्यास महानगर पालिकेच्या वतीने प्रथम रुपये ५००० दुसऱ्या वेळेस निदर्शनास आल्यास रुपये १०००० नंतर रुपये २५००० आणि त्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून तीन महिन्याचा कारावास या प्रमाणे दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आले आहे.

summary-400 kg plastic got seized in latur

आपली प्रतिक्रिया द्या