बोगद्यातील सर्व कामगार सुरक्षित, एंडोस्कोपी कॅमेरा सोडून केली पाहणी

गेल्या 10 दिवसांपासून उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांचा व्हिडीयो अखेर समोर आला. सहा इंचाच्या पाईपलाईनमधून एंडोस्कोपी कॅमेरा बोगद्यात सोडण्यात आला. वॉकी-टॉकीच्या माध्यमातून कामगारांशी बातचीतही करण्यात आली. सर्व कामगार सुरक्षित असल्याचे कॅमेऱ्यात दिसले. बोगद्यात अडकलेल्या सबाह अहमद यांच्या माध्यमातून सर्व कामगारांकडे कॅमेरा फिरवण्यात आला. पॅमेऱ्याची स्क्रीनही कपडय़ाने पुसण्यास सांगितले. एकूण किती कामगार आहेत त्याची मोजणी आणि बोगद्यातील परिस्थितीची पाहणीही कॅमेऱ्याद्वारे करण्यात आली. दरम्यान, सर्व कामगार सुरक्षित असल्याचे समजल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचा जीव भांडय़ात पडला.

तीन मार्गांनी सुटका

न थांबता ऑगर मशीनच्या माध्यमातून खोदकाम केले तर दोन ते अडीच दिवसांत बोगदा तयार करून कामगारांची सुटका करता येईल.

बोगद्याच्या दोन्ही बाजूंनी खोदून रस्ता तयार करता येईल. त्यासाठी 12 ते 15 दिवसांचा वेळ लागेल. डंडालगाव येथून बोगदा खणता येईल. परंतु त्यासाठी 35 ते 40 दिवस लागू शकतात.

पहिला व्हिडीओ आला समोर

पाईपलाईनमधून बोगद्यात ऑक्सिजन, ड्रायफ्रूट्स, औषधांचा पुरवठा

मोबाईल फोन आणि चार्जरही पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली

मानसिक आधारासाठी समुपदेशकही बोगद्याच्या ठिकाणी उपस्थित आहेत

कामगारांची हालचाल टिपण्यासाठी हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे