412 कोटींची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या चौघांना अटक

एटीएम क्लोनच्या माध्यमातून 412 कोटी रूपयांचा अपहार करणाचा टोळीचा डाव रामानंद नगर पोलीसांनी उद्ध्वस्त केला होता. यात शुक्रवारी तीन जणांना अटक केली होती. आज पुन्हा दोन आरोपी नाशिक तर एक आरोपीस कल्याण येथून अटक केली आहे. आता एकुण सहा संशयित आरोपी झाले आहे.

तथाकथित हॅकरच्या सहाय्याने 412 कोटींवर ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करून फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा रामानंदनगर पोलिसांनी इथिकल हॅकर मनीष भंगाळेच्या सहाय्याने पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी जळगावातील एका पत्रकारासह धुळ्यातील बिल्डरला अटक केली आहे. हेमंत ईश्वरलाल पाटील, रा.भुरे मामलेदार प्लॉट शिवाजीनगर जळगाव असे जळगावातील पत्रकाराचे नाव आहे. तर मोहसीन खान इस्माईल खान रा. देवपूर धुळे असे पोलिसांनी अटक केलेल्या बिल्डरला अटक केली होती. दोघांना आज शनिवारी न्यायालयात हजर केले असता या दोघांना 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आले.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथक नाशिक, कल्याण आणि गुजराथ रवाना झाले होते. संशयित आरोपी जयेश मनिलाल पटेल रा. चिखली, जि. नवसारी गुजरात याला राहत्या घरातून अटक केली. तर नाशिक येथून दिपक चंद्रसिंग राजपूत रा. पंचवटी नाशिक, भरत अशोक खेडकर रा. जेलरोड आणि कल्याण येथून रविंद्र मनोज भडांगे रा. जेलरोड नाशिक याला अटक केली आहे. यातील रविंद्र मनोज भडांगे हा नाशिक येथील युनियन बँकेत मॅनेजर म्हणून नोकरीला होता. मात्र अपहार प्रकरणात त्याला बँकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या तिघांच्या माध्यमातून आजून काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तिघांची रात्री उशीरापर्यंत चौकशी सुरू होती. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास राऊत, पोलीस कॉन्स्टेबल रवि चौधरी, रवि पाटील, उमेश पवार, शिवाजी धुमाळे यांनी केली

आपली प्रतिक्रिया द्या